Latest

COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार, २४ तासांत १४,५०६ नवे रुग्ण, ३० मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोना (COVID19) रुग्णसंख्येत चढ-उतार सुरु आहे. सोमवारी रुग्णसंख्येत घट झाली होती. पण गेल्या २४ तासांत पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १४,५०६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३० जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या वाढून ९९,६०२ वर पोहोचली आहे. बुधवारी दैनंदिन कोरोनासंसर्गदर ३.३५ टक्के एवढा होता. दिवसभरात ११,५७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात याआधीच्या दिवशी दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली होती. सोमवारी दिवसभरात ११ हजार ७९३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, ९ हजार ४८६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.५७ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर २.४९ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ३.३६ टक्के नोंदवण्यात आला होता.

कोरोनाविरोधात (COVID19) सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९७ कोटी ४६ लाख ५७ हजार १३८ कोटी डोस देण्यात आले आहेत. यातील १३ लाख ४४ हजार ७८८ डोस काल एका दिवसात देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत ३.६४ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत ४ कोटी ४७ लाख ७० हजार ७०९ बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

SCROLL FOR NEXT