Latest

Corona Virus : कोरोनाशी लढताना सर्वांनी राजकारण बाजूला ठेवण्याची गरज : अजित पवार

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाइन डेस्क : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. तसेच राज्यात अजूनही काही प्रमाणात कोविड पेशंट सापडत आहेत. या धर्तीवर आपल्याकडे सध्या पुन्हा कोरोनाची भीती वाढली आहे. त्यामुळे यासाठी राज्यशासनाने त्वरित पुढाकार घेऊन तसेच सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून पुढाकाराने प्रतिबंधात्मक कार्यक्रम सुरू करणे गरजेचे आहे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडले. ते नागपूर हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तर तासा दरम्यान बोलत होते. Corona Virus

दोन वर्षापूर्वी चिनमधून कोरोना जगभर पसरला आणि सर्वकाही ठप्प झाले होते. या दरम्यान अनेक देशांच्या अर्थव्यवस्था खिळखिळ्या झालेल्या आपण पहिल्या आहेत. अनेकांचे व्यवसाय अडचणीत आले आणि लाखो लोकांचे जीवही गेले. त्यामुळे या महामारीचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. चीनमध्ये पुनः कोरोना वाढू लागल्याने जगभर चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. कोरोनाने पुन्हा जगाला वेठीस धरण्याआधी अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय उचलण्यास सुरुवात झाली आहे. Corona Virus

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोरोना वाढू नये म्हणून राज्यशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे, असे मत मांडताना अजित पवार यांनी राज्य शासन यासाठी काय उपाययोजना करत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

…लवकरच टास्क फोर्स समिती – देवेंद्र फडणवीस

याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'यासाठी राज्यशासन तत्परतेने पाय उचलत असून कोरोना प्रतिबंधात्मक कामकाजसाठी लवकरच टास्क फोर्स समिती निर्माण करत आहे' असे उत्तर दिले. Corona Virus

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT