पुढारी ऑनलाइन डेस्क : Corona Prevent Meeting : चीनमध्ये कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर भारतात खबरदारी म्हणून आधीपासूनच उपाययोजना करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी आज कोरोना संदर्भात निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
Corona Prevent Meeting : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा भयानक उद्रेक झाला आहे. कोरोनामुळे मृतांची संख्या इतकी वाढली आहे की स्मशानभूमीत प्रेतांचा खच पडला असून अंत्यसंस्कारासाठी प्रेतांची रांग लागली आहे. चीन हा भारताचा शेजारी देश आहे. त्यामुळे चीनच्या परिस्थितीवरून भारतात आधीच खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कालच मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. तसेच यासंदर्भात लवकरच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय उच्चस्तरीय बैठक घेणार आहे. या बैठकीत साधारण कोण-कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे याविषयी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी वृत्त वाहिन्यांशी बोलताना माहिती दिली आहे.
Corona Prevent Meeting : जगभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाय योजना करणार – भारती पवार
कोरोनाचे संकट 2019-20 मध्ये संपूर्ण जगभर पसरल्यानंतर भारताने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती उल्लेखनीय आहे. भारताने वेगाने लसीकरणाची मोहीम राबवत 200 कोटींचा टप्पा गाठला आहे. लसीकरण उत्तमप्रकारे झाल्याने आपल्याकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटले आहे.
Corona Prevent Meeting : तसेच आजच्या उच्चस्तरीय बैठकीत जगभरातील कोरोनाची परिस्थिती तेथील उपाययोजना परिस्थिती आणि भारतातील कोरोनाची परिस्थिती इत्यादी बाबींचा आढावा घेऊन पुढील उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे जिनोम सिक्वेंसिंगचे आदेश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत, असे पवार यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :