'आदिपुरुष' या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांच्या एका व्हिडीओवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. ओम आणि क्रितीने नुकतेच तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. त्यानंतर एकमेकांचा निरोप घेताना ओम यांनी मंदिरासमोर क्रितीच्या गालावर हलका किस केला. यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे. आता तेलंगणातील चिलकुर बालाजी मंदिरातील मुख्य पुजार्यांनी या घटनेला निंदनीय असल्याचे म्हटले आहे. पती-पत्नीसुद्धा मंदिरात एकत्र जात नाहीत. तुम्ही हॉटेलच्या रुममध्ये जाऊन ते करू शकता. तुमचे वर्तन हे रामायण आणि देवी सीता यांचा अपमान करण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. ओम यांनी क्रितीच्या गालावर हलका किस केला. याच गुडबाय किसवरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. ओम राऊत आणि क्रितीच्या या व्हिडीओवर भाजपचे प्रदेश सचिव रमेश नायडू नागोथू यांनी टिप्पणी केली. सार्वजनिक ठिकाणी विशेषकरून मंदिराजवळ अशा पद्धतीने जाहीर वागणुकीची गरज होती का, असा सवाल त्यांनी केला आहे.