Latest

Controversial ad : जाहिरातींमध्ये महिला आणि धर्म-परंपरेचा वापर केला जातोय?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वी मंगळसूत्र आणि ब्लीच क्रीमच्या जाहिरातीवरून (Controversial ad) दोन कंपन्यांवर प्रचंड टीका झाली. त्यानंतर या कंपन्यांनी जाहिराती मागे घेतल्या. नेमकं काय दाखवलं होतं या जाहिरातीत? तर, एका जाहिरातीत 'सब्यसाची' फॅशन ब्रॅण्डने बंद खोलीतील स्त्री-पुरुष जोडीमधील जिव्हाळ्याचे क्षण दाखविण्यात आले होते. तर दुसऱ्या जाहिरातीत 'करवाचौथ' निमित्ताने ब्लीच क्रीमची जाहिरात करताना दोन महिला एकमेकांना चाळणीतून चंद्राकडे पाहताना दाखविण्यात आल्या होत्या.

हिंदू धर्माच्या आस्थेला आणि परंपरेला या जाहिरातींमध्ये (Controversial ad) चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आलं आहे, असं स्‍पष्‍ट करत हिंदू परंपरावादी लोकांनी आक्षेप घेतला. त्यांचं म्हणणं असं की, मंगळसुत्राच्या जाहिरातीत एका विवाहित स्त्रीचे आपल्या पतीबरोबरच्या बंद खोलीतील खासगी हलचाली थेट दाखविण्यात आला आहे.

आणि दुसऱ्या करवाचौथच्या जाहिरातीत समलैंगिक नात्याला अधोरेखित करण्यात आलं आहे, हे कारण या जाहिराती मागे घेण्यास ठरल्या. पण, काही स्त्री या परंपराच मानत नाहीत. कारण, त्यांच्या मते मंगळसूत्र घालणे, भांगेत कुंकू भरणे, चाळणीतून पतीला पाहणे, या हिंदू परंपरा स्त्री-पुरुषांमध्ये समानता दाखवत नाहीत.

इतकंच नाही तर विवाहित पुरुषांच्या शरीरावर ते विवाहित असल्याचा दागिना असत नाही आणि पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी त्यांना कोणता उपवास धरण्याची परंपरादेखील नाही. पुरुषांचं विवाहानंतर आपलं अडनाव बदललं जात नाही की, आपलं जन्मापासूनचं घर सोडावं लागत नाही.

समलैंगिकतेच्या नावावर मार्केटिंग : पारोमिता वोहरा

यावर लेखक पारोमिता वोहरा म्हणतात की, "ही जाहिरात समलैंगिकतेच्या नावावर मार्केटिंग करत आहे. लग्नाबरोबर स्त्रीला नवऱ्याची चिकटेलील जात, अधिकार आणि समानतेच्या दर्जा यावर काम करण्याऐवजी लग्नाच्या प्रक्रियेत नवनवी नाती तयार करण्याचा प्रकार सुरू आहे. भारतात समलैंगिक नातं ठेवणं बेकायदेशीर नाही. पण, समलैंगिक लग्नाला कायद्याने मान्यता देण्यात आलेली नाही."

लेखिका मधुरा चक्रवर्ती म्हणतात की, "या परंपरांमुळे असमानतेला समानता मानली जाते, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. मंगळसूत्र आणि भांगेतील कुंकू या परंपरा दाखवून देतात की, विवाहित स्त्रीचा मालक तिचा नवरा आहे. या सामाजिक परंपरेमध्ये पत्नीला हक्क देत नाही."

मागील वर्षी गोव्याच्या एका महाविद्यालयातील राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांनी आपल्या फेसबुक पेजवर मंगळसूत्राबाबत टाकलेली पाेस्‍टवर माेठा वाद झाला हाेता.  त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पितृसत्ता आणि परंपरेच्या संदर्भात सांगताना त्या प्राध्यापक म्हणाल्या की, स्त्रीयांसाठी विवाहित असल्याची खूण दर्शविण्यासाठी दागिने आणि पुरुषांसाठी का नाही?" या प्रगतीशील विचारांच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू युवा वाहिनीने केलेल्या तक्रारीनंतर त्या प्राध्यापकांना माफी मागणं भाग पडलं हाेते.

डाबरच्या ब्लीच क्रीमच्या जाहिरातीचा विचार केला की, त्यामध्ये स्त्रीच्या चेहऱ्याच्या सुंदरतेबद्दल सांगाण्याचा प्रयत्न केला. मात्र, समलैंगिक नात्याची आधुनिक ट्रिक वापरत त्यांनी त्याची जाहिरात केली. त्यावर धर्माच्या आणि परंपरेच्या बाजुने पाहिलं गेलं. एका राज्याच्या गृहमंत्र्यांची त्या संदर्भात कंपनीवर कारवाई करण्याची इशारा दिला हाेता. त्यानंतर या कंपन्यांनी जाहिराती मागे घेतल्या.

मूळात झालंय काय? तर जगभरात धर्म आणि परंपरा त्याचा फायदा घेत वेगवेगळ्या कंपन्या आपल्या जाहिरातीत वेगवेगळा फंडा वापरत आहेत. पण, यातून पंरपरेला धक्का लागल्याचा आक्षेपही तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये जाहिराती आणि धर्म-परंपरा यांचा थेट संबंध येत आहे. आणि त्या जाहिराती वादग्रस्त ठरत आहेत. ग्राहकासमोर कंपन्या मान टाकतात तशा पद्धतीने अनेक कंपन्यांना आपल्या जाहिराती मागे घेतलेल्या आहेत.

वादग्रस्त जाहिरात… 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT