Latest

‘एलियन’शी झाला संपर्क?; शास्त्रज्ञांना अंतराळातून पृथ्वीवर येणारे सिग्नल मिळाले, ते रेकॉर्डही केले

Arun Patil

लास वेगास : 'एलियन' जगताशी संपर्क झाल्यासारखे सध्या तरी शास्त्रज्ञांना वाटत आहे. कारण या शास्त्रज्ञांना अंतराळातून सातत्याने पृथ्वीवर येणारे सिग्नल मिळत आहेत. शास्त्रज्ञांनी ते रेकॉर्डही केले आहेत. हे एक नव्या प्रकारचे रेडिओ सिग्नल आहेत जे सामान्यपणे फास्ट रेडिओ बर्स्टपेक्षा वेगळे आहेत. शास्त्रज्ञांनी तब्बल 91 तास अंतराळातून ज्या दिशेने सिग्नल मिळत आहेत, त्या दिशेवर टेलिस्कोपच्या मदतीने नजर ठेवली. यादरम्यान 82 तासांत 1863 सिग्नल मिळाले.

हे रेडिओ सिग्नल पृथ्वीपासून दीर्घ अंतरावर असलेल्या एका आकाशगंगेतून येत आहेत. या आकाशगंगेचे नाव ऋठइ 20201124अ असे आहे. हे सिग्नल चीनच्या 'फाईव्ह हंड्रेड मीटर अपर्चर स्फेरिकल रेडिओ टेलिस्कोप'ने (एफएएसटी) पकडले आहेत. सध्या सिग्नलचा अभ्यास चीनमधील पेकिंग युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्रज्ञ हेंग शू हे करत आहेत. यासंदर्भात ते म्हणाले की, ऋठइ 20201124अ या आकाशगंगेतील एखाद्या 'मॅग्नेटोर' म्हणजे 'न्यूट्रॉन स्टार' हे सिग्नल पाठवत आहे. या तार्‍याजवळ प्रचंड मोठे चुंबकीय क्षेत्र आहे. ऋठइ 20201124अ हा असा एक तारा आहे की, जंगलात फिरणारा हिंस्त्र जनावरच.

दरम्यान, लास वेगासस्थित युनिव्हर्सिटी ऑफ नेवादाचे अ‍ॅस्ट्रोफिजिसिस्ट बिंग झांग यांनी सांगितले की, हे सिग्नल पाहून आम्हीही चाट पडलो. त्यांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका आणि चिनी खगोलशास्त्रज्ञ सध्या एकत्र काम करत आहेत. हे सिग्नल आमच्या कल्पनेपलीकडचे आहेत. एखाद्या वेगळ्या जगातून आमच्यासाठी संदेश तर पाठवण्यात येत नसतील ना? हे समजून घेण्याचा सध्या प्रयत्न करण्यात येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT