Latest

आजारांना दूर ठेवण्यासाठी भेंडीचे सेवन ठरते उपयुक्त

Arun Patil

नवी दिल्ली : अनेक लोकांना भेंडी खाणे आवडते. कोणत्याही ऋतूत ही भाजी मिळत असते. केवळ स्वादामुळेच नव्हे तर गुणामुळेही भेंडी उपयुक्त ठरते. अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी भेंडीचे सेवन लाभदायक ठरते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भेंडीमध्ये 'के' व्हिटॅमिन असते जे आपल्या हृदयासाठी लाभदायक आहे. त्यामुळे जर एखादी व्यक्ती हृदयरुग्ण असेल तर तिने आपल्या आहारात भेंडीचा समावेश करणे हितावह ठरते. हृदयाच्या समस्या कमी करण्यासाठी असा आहार उपयुक्त ठरू शकतो. भेंडीमध्ये 'फोलेट' असते जे गर्भवती महिलांसाठी लाभदायक ठरते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही भेंडी आरोग्यदायी आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी भेंडी उपयुक्त असते. पचनसंस्थेसाठीही भेंडी गुणकारी आहे. तसेच शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठीही भेंडीचा आहार उपयोगी ठरतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT