Latest

बहुपत्नीत्व विरोधातील याचिकेवरील सुनावणीसाठी घटनापीठ : सुप्रीम कोर्टाची संमती

अविनाश सुतार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मुस्लिम धर्मामध्ये प्रचलित बहुपत्नीत्व, निकाह हलाला आणि मुताह यावर बंदी घालण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने लवकरच घटनापीठ स्थापन करण्यास संमती दिली आहे. मात्र, अद्याप सुनावणीची तारीख निश्चित झालेली नाही. मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेल्या बहुपत्नीत्व, निकाह हलाला आणि मुताह या प्रकरणांच्या सुनावणीसाठी लवकरच तारीख निश्चित केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी सांगितले.

याचिकाकर्ते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेल्या बहुपत्नीत्व, निकाह हलाला आणि मुताह प्रथांवर बंदी घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेल्या या प्रथा बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, निकाह-हलाला प्रथेमध्ये घटस्फोटित महिलेला आधी दुसऱ्याशी लग्न करावे लागते. यानंतर, मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार, पुनर्विवाह करण्यासाठी पहिल्या पतीपासून घटस्फोट घ्यावा लागतो. दुसरीकडे, बहुविवाह म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त पत्नी किंवा पती असणे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT