Latest

Constipation : बद्धकोष्ठतेची कारणमीमांसा

दिनेश चोरगे
  • डॉ. मनोज कुंभार

पोट बिघडले असेल तर अन्न पचवायलाही त्रास होतो त्यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) होते. हळूहळू आरोग्याशी निगडित आणि इतरही काही समस्यांचा सामना करावा लागतो. पण फक्त चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे हे होते असे नाही. काही आजारांमुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

थायरॉईड :  हायपोथायरॉईडिजम मध्ये घशात जी फुलपाखराच्या आकारातील ग्रंथी असते त्यामधून शरीरात विशेष स्राव स्रवतात जेणेकरून शरीरातील पेशी योग्य प्रकारे आपले (Constipation) कार्य करू शकतात. त्यामुळे शरीराला उर्जा मिळतेच परंतु पचन क्रियाही चांगली राहते. या ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

मानसिक ताण : मानसिक ताण असल्यास व्यक्ती सतत विचारात राहते. योग्य आहार न घेतल्याने, व्यायाम किंवा शारिरीक हालचालीपासून दूर राहिल्याने हळूहळू आरोग्य बिघडते. त्यामुळे पचनासंबंधीच्या समस्या निर्माण होतात. जेवण सहजपणे पचत नाही. त्यामुळे मानसिक तणाव ग्रस्त व्यक्तीलाही बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होतो. त्यापासून बचाव करण्यासाठी मानसिक आजार किंवा मानसिक ताण यावर उपचार घेणे महत्त्वाचे असते.

इरिटेबल बाऊल सिंड्रोम : इरिटेबल बाऊल सिंड्रोम हा मोठ्या आतड्याशी निगडित आजार आहे. हा आजार सर्वसामान्यपणे आढळून येते. या आजाराची लक्षणे खूप काळानंतर शरीरात दिसून येतात पण त्याचा परिणाम (Constipation) मात्र संपूर्ण पचन क्रियेवर पडत असतो. पोट नीट साफ न झाल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.

औषधांचे अतिसेवन : काही लोक औषधांचे सेवन अधिक करतात. वेदनाशामक गोळ्या, अ‍ॅलर्जीची औषधे, लोहाच्या कॅप्सुल, कॅल्शिअम आणि रक्तदाब या औषधांमुळे बद्धकोष्ठतेची (Constipation) समस्या भेडसावू शकतो. त्यासाठी घरगुती उपाय न करता ताबडतोब डॉक्टरी सल्ला घ्यावा.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT