Latest

राहुल गांधी यांची ‘ईडी’ चाैकशी सुरु, सुरजेवालांसह काँग्रेसचे अनेक नेते ताब्यात

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल  हेराॅल्‍ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज (दि.१३) ईडीकडून चौकशी सुरू आहे. तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक त्यांची चौकशी करत आहे. दरम्‍यान,  ईडी कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. या दरम्यान काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्यासह पक्षाच्‍या अनेक नेत्‍यांसह  कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नॅशनल हेरॉल्‍ड प्रकरणी राहुल गांधी यांची सक्‍तवसुली संचालनालय ( ईडी ) चौकशी करत आहे. याविरोधात आज देशभरात विविध ठिकाणी काँग्रेसकडून 'ईडी' कारवाईविरोधात निदर्शने करण्‍यात आली. दिल्‍लीत प्रियांका गांधीही  रत्‍यावर उतरल्या आहेत. दिल्‍लीत मान सिंह रोडवर काँग्रेस कार्यकर्ते एकवटले. त्‍यांनी ईडीविरोधात निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी तत्‍काळ त्‍यांना ताब्‍यात घेतले आहे. या आंदोलनावेळी पोलिसांचाही फौजफाटा तैनात करण्‍यात आला आहे.

काँग्रेस झुकणार नाही

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आमचे काम आंदोलन करणे आहे, त्यांना 144 लावून आम्हाला रोखायचे असेल तर थांबा. हे राजकीय नाही, हे लोक सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते काँग्रेसला झुकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण काँग्रेस झुकणार नाही. काँग्रेस लढत राहील आणि उभे राहील. असे खर्गे म्हणाले.

या वेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्‍हणाले, प्रियांका गांधी ॲक्‍शन मोडमध्ये असून गांधी कुंटुबियांचे देशासाठी मोठे योगदान आहे, हे विसरून चालणार नाही. मात्र आता गांधी कुंटुबियांच्या बदनामीचा प्रयत्‍न केला जात आहे. असे नाना पटोले म्‍हणाले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT