Latest

काहीही करुन नगर जिंकायचं, राष्ट्रवादीने चंग बांधला पण काँग्रेसही दावा ठोकण्याचा तयारीत

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा: नगर लोकसभेच्या जागेवर काँग्रेस दावा ठोकण्याच्या तयारीत असून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी करावी, अशी मागणी नगर शहर जिल्हा काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या या दाव्यामुळे मविआत संघर्षाची चिन्हे निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रदेश काँग्रेसकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा २ जूनला मुंबईत घेतला जाणार आहे. त्यात नगर लोकसभा (दक्षिण)चाही समावेश आहे. शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आ. थोरात यांची भेट घेतली. आ. थोरात यांनी काँग्रेसच्या चिन्हावर नगरमधून उमेदवारी करावी अशी मागणी करत शिष्टमंडळाने थोरातांना साकडे घातले आहे. या मागणीमुळे नगरमध्ये राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.

ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्याक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, ओबीसी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गिते, उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, विलास उबाळे, रोहिदास भालेराव, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश अल्हाट, काँग्रेस सामाजिक न्याय युवा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे यांच्या शिष्टमंडळाने थोरात यांची भेट घेतली.

SCROLL FOR NEXT