Latest

काँग्रेसची महिलांना ‘साथ’, ‘नारी न्‍याय गॅरंटी’ची घाेषणा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (दि.१३ मार्च) 'नारी न्‍याय गॅरंटी'ची घोषणा केली. या याेजनेच्‍या माध्‍यमातून सत्तेत आल्‍यास काँग्रेस पक्ष महिलांसाठी पाच विशेष याेजना राबविणार असल्‍याचे त्‍यांनी जाहीर केले.

खर्गे म्‍हणाले की, काँग्रेस आज 'नारी न्‍याय गॅरंटी' ( महिला न्याय हमी) घोषणा जाहीर करत आहे. केंद्रात सत्तेत आल्‍यास या योजने अंतर्गत काँग्रेस पक्ष देशातील महिलांसाठी एक नवा अजेंडा ठरवणार आहे.

काँग्रेसने जाहीर केल्‍या पाच योजना …

  • 'महालक्ष्मी हमी' : या अंतर्गत गरीब कुटुंबातील प्रत्येक महिलेला वार्षिक 1 लाख रुपयांची मदत दिली जाईल.
  • ' निम्‍मी लोकसंख्या-पूर्ण अधिकार' : या अंतर्गत केंद्र सरकारच्या नवीन नियुक्त्यांमध्ये महिलांना निम्मे अधिकार मिळतील.
  • 'सत्तेचा आदर' : या योजनेंतर्गत अंगणवाडी, आशा आणि माध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात केंद्र सरकारचे योगदान दुप्पट केले जाईल.
  • 'अधिकार मैत्री' : या योजने अंतर्गत, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि आवश्यक मदत देण्यासाठी प्रत्येक पंचायतीमध्ये एक पॅरा-लीगल म्हणजेच कायदेशीर सहाय्यक अधिकारी मित्र म्हणून नियुक्त केला जाईल.
  • 'सावित्रीबाई फुले वसतिगृह' : सर्व जिल्हा मुख्यालयात नोकरदार महिलांसाठी किमान एक वसतिगृह बांधले जाईल. या वसतिगृहांची संख्या संपूर्ण देशात दुप्पट केली जाईल.

आमचे आश्‍वासने ही पोकळ आश्वासने नाहीत

यावेळी खर्गे म्‍हणाले की, काँग्रेस पक्षाने यापूर्वी आम्ही सहभागी न्याय, शेतकरी न्याय आणि युवा न्याय जाहीर केला आहे. आमची आश्‍वासने ही पोकळ आश्वासने आणि विधाने नाहीत. आम्‍ही आमच्‍या शब्‍दाला जागतो. हा आमचा 1926 पासून आतापर्यंतचा विक्रम आहे, आमचे विरोधक जन्माला आल्यापासून आम्ही जाहीरनामे बनवत आलो आहोत आणि त्या घोषणांची पूर्तता करत आहोत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT