Latest

महागाई, बेरोजगारी विरोधात काँग्रेसचे आंदोलन, राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

स्वालिया न. शिकलगार

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : महागाई आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. संसद भवनसमोर काँग्रेस आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देत हल्लाबोल केला. यावेळी आंदोलनात काॅंग्रेस नेते राहुल गांधी सहभागी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांकडून राहुल गांधींना ताब्यात घेतले आहे. ईडीच्या कारवायांविरोधातही आंदोलक संतप्त झाले. यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू होती.

दरम्यान, एआयसीसी मुख्यालयात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ता जमले. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर हल्ला चढवला होता. संसद भवन ते राष्ट्रपती भवन हा मोर्चा निघणार होता.

काऴ्या कपड्यांमध्ये गांधी परिवार रस्त्यावर उतरला आहे. हे देशव्यापी आंदोलन आहे. त्यामुळे जागोजागी हे भाजप सरकारविरोधात तीव्र संताप व्य़क्त केला जात आहे. काँग्रेसचे कार्यकर्त्यांनीही बिहारमध्ये तसेच हैदराबादमध्ये आंदोलन केले.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, आम्ही शांतीने राष्ट्रपती भवन येथे जाणार होतो. रॅलीमध्ये सर्व लोक राज्यसभा आणि लोकसभा खासदार आहेत. पण, आम्ही जाण्याची परवानगी देत नाही. महागाई आणि बेरोजगारीचे मुद्दे घेऊन येथे आम्ही आलो आहोत. लोकतंत्रची हत्या होत आहे. आमचे काम हे निश्चित करणे आहे की, भारतीय लोकशाही सुरक्षित होवो. आमचे काम जनतेच्या समस्या समोर आणणे आहे. आम्ही आमचे काम करत आहोत.

SCROLL FOR NEXT