पुढारी ऑनलाईन डेस्क : नवीन संसद भवनात 'जवान'( jawan ) या चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्याची केंद्र सरकारची हिंमत आहे का, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'गदर २' चे संसद भवनात स्क्रिनिंग पार पडले होते.
जयराम रमेश यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, काही दिवसांपूर्वी सनी देओलच्या 'गदर २' या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले. यामुळे आता नवीन संसद भवनमध्ये 'जवान' ( jawan ) चित्रपटाची स्क्रिनिंग करण्यात यावे. या चित्रपटात शाहरुख खानचा एक डायलॉग असून त्यात तो तुमचे मतं मागत आहेत. ताे या डायलाॉगमध्ये म्हणताे की, पुढील ५ वर्षे तो माझ्यासाठी काय करेल?. सनीचा 'गदर २' २५ ऑगस्टपासून तीन दिवस सर्व लोकसभा सदस्यांना दाखविण्यात आला. संसदेत चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ हाेती.
सनी देओल भाजपचे लोकसभेचे खासदार आहेत. ते गुरुदासपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. सनी देओल भाजपचा खासदार असल्याने त्याच्या चित्रपटाचे स्क्रिनिंग संसद भवनात पार पडल्याची चर्चांना उधाण आले आहे. 'जवान' चित्रपटात अभिनेता शाहरुख खान, विजय सेतुपती आणि नयनतारा यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत आहे. शाहरुखच्या 'जवान' मध्ये राजकीय संदेश दिला असून अनेक प्रश्न मांडले आहेत. आता काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी जवान चित्रपटाचे संसद भवनात स्क्रिनिंग करण्याचे आव्हान करत केंद्र सरकारची काेंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा :