Latest

उद्घाटनाचा राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान: थोरात

अमृता चौगुले

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद असून नवी दिल्ली येथे बांधलेल्या नवीन सेंट्रल व्हिस्टा या संसद इमारतीचे उद्घाट नासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान असल्याची खंत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर आहे.

संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठी आणि समृद्ध लोकशाही असलेल्या भारतात राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. या पदावर महामहीम राष्ट्रपती म्हणून द्रौपदीजी मुर्म या आदि वासी समाजातील महिला विराजमान झाले आहेत. उद्घाटनाचा अधिकार हा राष्ट्रपतीचा आहे. मात्र असे होताना दिसत नाही हे संपूर्ण देशाला वाईट वाटणारे असल्याची खंत आ थोरात यांनी व्यक्त केली

आदिवासी , मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना संधी न देणे हा राज्यघटनेचा अपमान आहे. समृद्ध लोकशाही अस लेल्या या देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने नवीन संसद भवनाच्या उद्घाटन केले पाहिजे. ही सर्वसामान्य देशवासि यांची रास्त भावना आहे .मात्र असे होताना दिसत नाही याचे संपूर्ण देशाला वाईट वाटत असल्याची ही खंत आ थोरात यांनी व्यक्त केली

SCROLL FOR NEXT