दापोली; प्रवीण शिंदे : दापोलीत आज (दि. २७) गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी दापोली मधील राधाकृष्ण मंदीर येथे पार पडलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार बाळ माने, धैर्यशील पाटील,सूर्यकांत दळवी,केदार साठे,डॉ विनय नातू, उपस्थित होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केल्या. ते म्हणाले काँग्रेस सरकारच्या काळात गरिबांना देण्यात येणारी मदत ही त्यांचेपर्यंत पूर्ण पोहोचत नव्हती. तर त्यातील पैसे हे काँग्रेसचे दलाल खात होते, अशी टीका गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.
भारतीय जनता पक्ष हा विचारांचा पक्ष आहे, इथं व्हिजन आहे. त्यामुळे अनेक पक्षातील कार्यकर्ते भाजप पक्षात प्रवेश करत आहेत. मोदी हे विश्वगुरु आहेत. त्यांच्यामुळे देशाचा विकास झाला आहे. 2014 ते 2024 या दहा वर्षात देशात विकास झाला. मात्र काँग्रेस सरकारच्या काळात कोणत्याच योजनेचा लाभ लोकांना मिळाला नाही.अखंड भारताचे स्वप्न जर कुणी पूर्ण केलं असेल तर ते मोदी यांनी , त्यामुळे अबके बार चारशे पार करून पुन्हा भाजप पक्षाला सत्तेत आणायचं आहे.त्यामुळे पुढील खासदार हे भाजपचे असतील असे सांगून धैर्यशील पाटील यांचे नावावर त्यांनी शिक्कामोर्तब केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थाने नारी सन्मान केला आहे.काँग्रेस यांनी फक्त हात दाखवला.पण भाजप पक्षाने लोकांच्या हाताला काम मिळून दिले. अनेक लाभदायी योजना भाजप पक्षाने दिल्या आहेत. एकशे चाळीस कोटी जनता उपाशी राहिली नाही पाहिजे त्या साठी अन्यधान्य योजना सुरू केल्या आहेत.या वेळी अनेक पक्ष प्रवेश झाले.
दापोलीतील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात धैर्यशील पाटील यांच्या नावाचा भावी खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला.त्यामुळे भाजप कडून धैर्यशील पाटील हे निश्चित असल्याचा अनेकांनी पुनरुच्चार केला.