Latest

बेळगाव विधानसभा : मंत्र्याच्या भ्रष्टाचारप्रकरणी काँग्रेसचा विधानसभेत गोंधळ; कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

backup backup

बैळगाव ; पुढारी वृत्तसंस्था

मंत्र्यावरील भ्रष्टाचारावर चर्चा करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी विधानसभेत काँग्रेस सदस्यांनी जोरदार गोंधळ घातला. यानंतर सभापती विश्वेश कागेरी हेगडे यांनी सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेतला.

कर्नाटकातील एका मंत्र्यांने केलेल्या जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात आम्हाला चर्चेसाठी सभागृहात परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते, कॉंग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी केली. यावर सभापती हेगडे यांनी, हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे त्यावर सभागृहात चर्चा करता येणार नसल्याचे सांगितले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस सदस्यांनी जोरदार हंगामा सुरू करत सभापतींच्या आसनासमोर येऊन धरणे धरले. सरकारतर्फे निवेदन देण्याचाही प्रयत्न झाला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सभागृहात निवेदन दिले. ते म्हणाले की, मंत्र्यांच्या एका खासगी जमीन विक्री प्रकरणी एकाने फसवणुकीची तक्रार न्यायालयात केली आहे. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सभागृहात त्याप्रकरणाची चर्चा करून न्यायलायावर दबाव टाकता येणार नाही.

मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनावर विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी आपला गोंधळ चालूच ठेवला. त्यानंतर दुपारी दीड वाजता सभापतीनी सोमवार पर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT