Latest

Comrade Govind Pansare Case : पानसरेंनी ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक लिहिले म्हणून हत्या; कुटुंबीयांचा हायकोर्टात दावा

सोनाली जाधव

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहिले होते. त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली, असा दावा पानसरे कुटुंबीयांतर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.

Comrade Govind Pansare Case : कुटुंबीयांचा हायकोर्टात दावा

तसेच अतिरिक्त माहिती देणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले. याची दखल घेतानाच न्यायालयाने एटीएसला चार आठवड्यांत संबंधित माहितीची पडताळणी करण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब ठेवली.पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी पानसरे कुटुंबीयांतर्फे अॅड. अभय नेवगी यांनी 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाचा संदर्भ दिला. या पुस्तकात कॉम्रेड पानसरे यांनी शिवाजी हिंदू राजा होता, मात्र हिंदू राष्ट्र बनवण्याची शिवाजीची कधीही इच्छा नव्हती, असे लिहिले होते. याच उल्लेखावरून पानसरेंची हत्या झाली, असा दावा अॅड. नेवगी यांनी केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT