Latest

Raju Srivastava : कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका, , रुग्णालयात दाखल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिध्द कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) ला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजू श्रीवास्तवची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील एम्स रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समोर आले आहे. (Raju Srivastava)

राजूच्या भावाने आणि पीआरओने राजूला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआऊट करत होता. तो ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना तेव्हा पळताना त्याला छातीत दुखू लागलं आणि तो खाली पडला. यानंतर राजू श्रीवास्तवला तत्काऴ रुग्णालयात नेण्यात आलं. राजूचे पीआरओ अजीत सक्सेनाचं म्हणणं आहे की, कॉमेडियन राजू पक्षाच्या काही मोठ्या नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत थांबले होते. सकाळी जिम करण्यासाठी ते गेले होते. तेथे त्यांना हार्ट अॅटॅक आला. आता त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. पीआरओने कॉमेडियनच्या सर्व चाहत्यांना राजूच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची मागणी केलीय.

SCROLL FOR NEXT