Latest

Karan Johar : कॉमेडियन केतन सिंहने मिमिक्री केल्याने संतापला करण जोहर, लगेच ‘त्याने’ मागितली माफी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार्सना ट्रोल करणे नेटिझन्ससाठी कोणतीही सामान्य गोष्ट नाही. पण, जेव्हा इंडस्ट्रीतील लोकचं या स्टार्सची खिल्ली उडवायला लागले तर, ही गोष्ट दु:ख देणारी आहे. अशा आशयाची एक नोट दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. त्याने एका कॉमेडी शोमध्ये त्याची खिल्ली उडवल्याचे सांगितले आहे. (Karan Johar)

करण जोहरने २५ वर्षांपूर्वी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्याचे खूप कौतुकदेखील होताना दिसलं. तर अनेकदा त्याला टीकेला सामोरे जावं लागलं. पण, आता एका कॉमेडी शोमध्ये त्याची खराब मिमिक्री करण्यात आली. करण जोहरने एक क्रिप्टिक नोट शेअर केलं. यामध्ये त्यांनी सांगितलं की, तो आपल्या आईसमवेत टीव्ही पाहत होता. तेव्हा एका रिॲलिटी कॉमेडी शोचा प्रोमो एका प्रसिद्ध चॅनेलवर आला.

त्याने लिहिलं की, "मी माझ्या आईसोबत बसलो होतो आणि टीव्ही पाहत होतो. दरम्यान, एका रिॲलिटी कॉमेडी शोचा प्रोमो एका प्रसिद्ध चॅनलवर आला. यामध्ये एक कॉमिक आर्टिस्ट खूप वाईट पद्धतीने माझी मिमिक्री करत होता. मी ट्रोल्स आणि त्या लोकांकडून अशा प्रकारचे वर्तन समजू शकतो. पण, जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा लपवून बोलता, पण, तुमच्या स्वत:च्या इंडस्ट्रीत अशा माणसाची खिल्ली उडवता, जो २५ वर्षांपेक्षा अधिक काळ या बिझनेसमध्ये आहे, तर हे खूप चुकीचे आहे. मला खूप राग देखील येत नाही. पण खूप दु:खी झालो आहे."

करण जोहरच्या या नोटवर एकता कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर नोटचे स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले आहे, असे अनेकदा झाले आहे. कधी-कधी शोमध्ये खूप वाईट पद्धतीने खिल्ली उडवली जाते. येथील ॲवॉर्ड शोमध्येही असे होते. करण जोहर त्या लोकांना विचारायला पाहिजे, ज्यांनी ही नक्कल केली आहे." करण जोहरचा निशाणा केतन सिंहकडे होता.

केतन सिंहने मागितली माफी

करण जोहरची इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल झाल्यानंतर केतन सिंहने एका मुलाखतीत माफी मागितली. तो म्हणाला, "मी जोदेखील अभिनय केला, कारण मी कॉफी शोमध्ये करण जोहरला खूप वेळा पाहतो. मी त्यांच्यासाठी उपयोगी फॅन आहे. पण, जर माझ्या बोलण्याने आणि ॲक्शनने त्यांना दु:ख झालं असेल तर मी त्यांची माफी मागतो. त्यांच्या भावना दुखवायचा माझा उद्देश नव्हता. पण, माझ्याकडून चुकीचे झाले असेल तर मी माफी मागतो."

SCROLL FOR NEXT