Latest

राज्यात गार वारे सुटले, मान्सूनची आगेकूच

अमृता चौगुले

पुणे : अरबी समुद्राकडे बाष्पयुक्त वारे येत असल्याने राज्यातील बहुतांश भागात गुरुवारी सायंकाळपासून गार वारे सुटण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश भागातील कमाल तापमानाचा पारा 3 ते 4 अंशांनी कमी झाल्याचे दिसले. दरम्यान, निकोबार बेटावर मान्सूनची आगेकूच सुरू असून, तो प्रगतिपथावर आहे.

मंगळवारपासून अरबी समुद्राकडे बाष्पयुक्त वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील उष्णतेच्या लाटेत किंचित फरक झाला आहे. विदर्भातील कमाल तापमान 44 अंशांवरून 41 ते 42 अंशांवर, मध्य महाराष्ट्रातील तापमान 40 वरून 36 अंशांवर आले आहे. मराठवाड्यात मात्र पारा अजून 40 अंशांवर आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 27 एप्रिलपासून राज्यातील कमाल तापमानात बरीच घट होईल.

गुरुवारचे राज्याचे तापमान..

पुणे 36.2, कोल्हापूर 34, महाबळेश्वर 30.6, नाशिक 36.3, छत्रपती संभाजीनगर 39, अकोला 42, चंद्रपूर 43, अमरावती 41, गोंदिया 42,वर्धा 42.

आज हवामान विभाग मान्सूनचा अंदाज देणार..
उद्या, दि. 26 मे रोजी हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. पै हे दुपारी 12 वाजता मान्सूच्या पुढील वाटचालीबाबत दिल्ली येथून ऑनलाईन माहिती देणार आहेत. यात मान्सून केरळात कधी येईल, उष्णतेची लाट कधी कमी होईल याचा अंदाज देणार आहेत.

SCROLL FOR NEXT