Latest

Coal India : कोल इंडियाकडून 17 वर्षांत पहिल्यांदाच उद्दिष्टापेक्षा जास्त कोळशाचे उत्पादन

backup backup

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 31 Coal India : सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया कंपनीने मागील 17 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच उद्दिष्टापेक्षा जास्त कोळशाचे उत्पादन केले आहे. कोल इंडियाने यंदासाठी सातशे दशलक्ष टन इतके कोळसा उत्पादनाचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य मागे टाकले गेले आहे. याआधी 2006 साली उद्दिष्टापेक्षा जास्त कोळसा उत्पादन झाले होते.

कोल इंडिया Coal India ही जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीकडून 703.4 दशलक्ष टन इतके कोळसा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी कंपनीकडून 622.6 दशलक्ष टन इतके उत्पादन करण्यात आले होते. 2006 साली 343 दशलक्ष टन उत्पादनाचे अंदाज ठेवण्यात आले होते आणि त्यावर्षी 343.4 दशलक्ष टन उत्पादन करण्यात आले होते.

कोल इंडियाने ट्विट करून याचा आनंद साजरा केला आहे. कोल इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची माहिती देण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT