Latest

उत्तर प्रदेश : नुपूर शर्मांच्या निषेधार्थ आंदोलन, शुक्रवारच्या नमाजनंतर पोलिसांवर दगडफेक!

रणजित गायकवाड

लखनौ, पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. शुक्रवारच्या नमाजनंतर मुसलमान संघटनांनी त्या घटनेचा निषेध करण्याचे ठरवले होते. त्यानुसार शुक्रवारी नमाजनंतर काही राज्यात आंदोलने करण्यात आली. यामुळे तिथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. उत्तर प्रदेशातील प्रयागराज, मुरादाबादमध्ये नमाजनंतर विरोध प्रदर्शनाला सुरूवात झाली. यामुळे येथील वातावरण तंग झाले होते.

प्रयागराजमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. जवळपास १ तासाहून अधिकवेळ दगडफेक सुरू होती. तणावग्रस्त भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. प्रयागराजच्या अटाला भागात ही दगडफेक सुरू होती.

नमाजनंतर रस्त्यावर उतरलेल्या मुसलमानांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. अचानक कुठूनतरी दगड भिरकावण्यात आला आणि दगडफेकीला सुरुवात झाली. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करावा लागला. मुराबादाबाद इथेही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मुगलपुरा भागात रस्त्यावर उतरून परिस्थिती तणावग्रस्त बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT