Latest

CJI DY Chandrachud : सरन्‍यायाधीशांनी वकिलांना दिला निरोगी जगण्‍याचा कानमंत्र, म्‍हणाले…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपण सगळेच खूप तणावपूर्ण जीवन जगतो. त्‍यामुळे निरोगी आयुष्य जगण्यासाठी मन शांतीसाठी नियमित योग करणे आवश्‍यक आहे. चांगलं विचार आणि मन शांती हे निरोगी आयुष्यासाठी खूप गरजेचं आहे, असा निरोगी जगण्‍याचा कानमंत्र सरन्‍यायाधीश धनजंय चंद्रचूड यांनी वकिलांना दिला.  ते बोलत होते. ( CJI DY Chandrachud)

CJI DY Chandrachud : शिस्‍तबद्‍ध जीवनशैली वकिलांसाठी खूप अघवड गोष्‍ट

सर्वोच्च न्यायालयात एका कार्यक्रमात बोलत असताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, "वकिलांनी आणि त्‍यांच्‍या सर्व सहाय्‍यकांनी नियमित योगसने केली पाहिजे.स्वतःची काळजी घेण्याच्या दृष्टीने जीवनाची चांगली मूल्ये शिकवणे आवश्‍यक आहे. योग्‍य आहार आणि चांगलं विचार करण्यात वेळ घालवला तर मनशांती लाभते. आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी मन शांत असणं खूप गरजेचं आहे. शिस्‍तबद्‍ध जीवनशैली ही वकिलांसाठी खूप अघवड गोष्‍ट आहे. कारण आपण सगळेच खूप तणावपूर्ण जीवन जगतो. धावपळीच्‍या जगण्‍यात योग हा निरोगी राहण्‍यासाठी आवश्‍यक बाब असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी नमूद केले."

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT