Latest

सर्किट चित्रपट : मिलिंद शिंदे खलनायकाच्या भूमिकेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते मिलिंद शिंदे यांनी विविध भूमिकांमधून आपल्या कसदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. पण ७ एप्रिलला प्रदर्शित होणारा "सर्किट" हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीकला अनोखा चित्रपट ठरणार आहे. कारण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकी भूमिकेसाठी त्यांच्या वाट्याला एकही संवाद नाही. केवळ शारीरिक हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभावांच्या जोरावर त्यांनी या भूमिकेत अभिनयाचे रंग भरले आहेत.

भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे. स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. चित्रपटात वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी, मिलिंद शिंदे अशी तगडी स्टारकास्ट आहे.
हा चित्रपट ७ एप्रिलला चित्रपटगृहात रिलीज होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT