Latest

राहुल गांधीना दहा वेळा फोन केला, तरीही

अनुराधा कोरवी

बिहारमधील मुरब्बी नेते रामविलास पासवान यांना राजकीय वार्‍याची दिशा अचूक कळत असे. त्यामुळे केंद्रात कोणताही पक्ष सत्तेवर असला, तरी त्यात पासवान यांचा समावेश निश्चित मानला जायचा. 2014 मधील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या लोकजनशक्ती पक्षाने 'एनडीए'मध्ये जाण्याऐवजी काँगे्रसशी जागावाटपासाठी चर्चा करायचे ठरवले होते.

स्वतः पासवान यांना 'एनडीए'मध्ये जाण्यात फारसा रस नव्हता. मात्र, त्यांचे चिरंजीव चिराग हे 'एनडीए'मध्ये जावे, या मताचे होते. तरीही वडिलांच्या सांगण्यावरून जागावाटपाबद्दल चर्चेकरिता त्यांनी राहुल गांधी यांना दहा वेळा फोन लावला. प्रत्येक वेळी राहुल यांनी त्यांच्या कॉलकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे चिराग यांचा संताप अनावर झाला. त्यावेळी रामविलास पासवान यांनी चिराग यांना समजावले की, जागावाटपासाठी चर्चा करायची तर राहुल यांच्याकडून एवढी कात्रभावना दाखवली जात आहे.

आपण त्यांच्यासोबत खरोखरच गेलो तर ते आपली अवस्था कशी करतील, याचा विचार कर. यानंतर चिराग यांनी क्षणाचाही विलंब न करता 'एनडीए'सोबत जायचा निर्णय घेतला. खुद्द रामविलास पासवान यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

SCROLL FOR NEXT