Latest

टिकटॉकबाबत पहिल्यांदाच चीनने केली भूमिका जाहीर, म्हणाले जबरदस्ती विक्रीला विरोध

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: चीनने पहिल्यांदाच टिकटॉक या शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. सध्या टिकटॉकवर अनेक देशांमध्ये बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र टिकटॉकच्या सक्तीच्या विक्रीला चीनने विरोध केला आहे. चीनची भूमिका अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा अनेक देशांमध्ये टिकटॉक हे सुरक्षेसाठी धोका असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत अनेक देशांमध्ये टिकटॉकवर सातत्याने बंदी घातली जात आहे. अमेरिकेतही सरकारी गॅजेट्समध्ये टिकटॉकवर बंदी आहे. यासोबतच आता संपूर्ण देशात शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म बंद करण्याची मागणी होत आहे.

चीनकडून टिकटॉकचा बचाव

चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, ते टिकटॉकच्या कोणत्याही सक्तीच्या विक्रीला कडाडून विरोध करेल. ते म्हणाले की, टिकटॉकच्या विक्री किंवा निर्गुंतवणुकीत तंत्रज्ञानाची निर्यात करणे समाविष्ट असेल आणि त्यासाठी चीन सरकारची परवानगी आवश्यक असेल.

टिकटॉकच्या सीईओची यूएस काँग्रेससमोर हजेरी

अमेरिका सरकारने शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉकला सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. सरकारी गॅजेट्समध्ये टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर आता संपूर्ण देशात त्यावर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वास्तविक, चिनी सोशल मीडिया अॅप टिकटॉकवर आपला डेटा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला पुरवल्याचा आरोप आहे. या आरोपांदरम्यान टिकटॉकचे सीईओ शाउ जी च्यू यांनी गुरुवारी यूएस काँग्रेससमोर साक्ष दिली.

चार तास चाललेल्या सुनावणीदरम्यान च्यु यांनी वारंवार सांगितले की, कंपनी चीन सरकारसोबत कोणताही डेटा शेअर करत नाही. त्याचवेळी च्यू असेही म्हणाले की, अॅप अमेरिकेमधील 150 दशलक्ष वापरकर्त्यांना धोका देत नाही किंवा ते चायनीज कम्युनिस्ट पार्टी (CCP) सोबत डेटा सामायिक करत नाही.

अमेरिकेने दिला भारताचा हवाला

यूएस काँग्रेस सदस्य डेबी लेस्को यांनी च्यू यांच्या प्रश्नावर भारत आणि इतर देशांचा हवाला दिला. ते म्हणाले की, भारत आणि इतर देशांनी अलिकडेच टिकटॉकवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बंदी घातली आहे.

लेस्कोने च्यु यांना विचारले की, टिकटॉक हे एक उपकरण आहे, जे शेवटी चिनी सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एकीकडे हे सर्व देश जे टिकटॉकवर बंदी घालत आहेत, तर आमचे एफबीआय संचालक चुकीचे कसे असू शकतात? यावर च्युने यांनी उत्तर दिले, मला वाटते की उल्लेख केलेले बरेच धोके काल्पनिक आहेत. मला याबाबत कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

या देशांनी घातली टिकटॉकवर बंदी

राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत अनेक देशांमध्ये टिकटॉकवर सातत्याने बंदी घातली जात आहे. अलीकडेच डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालयानेही सरकारी कर्मचाऱ्यांच्या फोनमध्ये टिक टॉक वापरण्यास बंदी घातली आहे. त्याचवेळी बेल्जियम आणि अमेरिकेत यांनीही सरकारी गॅजेट्समध्ये टिकटॉकवर बंदी आहे. भारताने 2020 मध्ये टिकटॉकवर बंदी घातली आहे. 29 जून 2020 रोजी, भारत सरकारने टिकटॉकसह 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT