बीजिंग : एकीकडे अंतराळात संशोधनासाठी अंतराळवीर पाठवतानाच चीनने आता थेट पृथ्वीच्या पोटालाच हात घातला आहे. भूगर्भाच्या खाली तब्बल 11 कि.मी. म्हणजे 11 हजार 100 मीटरपर्यंत बोअर होल खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून कोणत्या काळात खंडांची निर्मिती कशी झाली यासह पृथ्वीबाबतच्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शिनजिआंग प्रांतात ताक ली माकन वाळवंटात चीनने हा प्रकल्प हाती घेतला असून, तेथील तारीम खोर्यात हे बोअर घेण्याचे काम सुरू आहे. कशासाठी हा आटापिटा? : हे खोदकाम करताना पृथ्वीच्या पोटातील जवळपास 10 खंडीय भूस्तर भेदले जाणार असून, त्याच्या अभ्यासातून पृथ्वीवर खंडांची निर्मिती कधी व कशी झाली, भूस्तर कसे बदलत गेले, वातावरणात काय बदल झाले आणि पृथ्वीवरील जीवन कोणत्या टप्प्यावर कसे बदलत गेले, याची माहिती हाती लागणार आहे. खंडीय भूस्तर हा दगडांचा थर या माहितीचा मोठा स्रोत आहे. त्यातून भूकंप, ज्वालमुखी उद्रेक, वातावरण बदल व त्यांचे परिणाम हेदेखील समोर येणार आहेत.
हेही वाचा :