Latest

‘वात्रट कार्ट्या’ला चिम्पांझी मातेने बदडले!

Arun Patil

नवी दिल्ली : चिम्पांझी हा माणसाचा सर्वात जवळचा नातेवाईक असलेला प्राणी आहे. चिम्पांझी आणि माणसाचे डीएनए 98 टक्क्यांपर्यंत एकसारखेच असतात. अत्यंत बुद्धिमान असलेला हा प्राणी बर्‍याच वेळा माणसासारखेही वर्तन करीत असतो. आता 'आई ही आईच असते' हे दाखवणारे असेच एक चिम्पांझी मादीचे वर्तन दिसून आले आहे.

पर्यटकांना दगड मारणार्‍या वात्रट पिलाला या आईने चक्क काठीने बदडून काढले! आपली आई आपल्याला लहानपणापासून वेगवेगळ्या चांगल्या, वाईट गोष्टींबद्दल शिकवत असते. आपल्या चुका सुधारत असते आणि वेळप्रसंगी फटकेही देते. मात्र प्राण्यांच्या बाबतीत कसं असेल बरं? प्राण्यांनाही त्यांची आई बदडत असेल का? अशाच एका चिम्पांझीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये चिम्पांझीने केलेल्या आगाऊपणामुळे त्याच्या आईने त्याला चांगलेच फटके दिलेले पाहायला मिळत आहे. तर झालं असं की, एका प्राणी संग्रहालयात खडकावर 3 ते 4 चिम्पांझी बसले होते. यावेळी प्राणी संग्रहालयात आलेल्या पर्यटकांनी चिम्पांझींना पाहण्यासाठी गर्दी केली. यावेळी तिथे बसलेल्या चिम्पांझीने पर्यटकांवर दगड फेकायला सुरुवात केली. तेवढ्यात हे सगळं चिम्पांझीच्या आईने पाहिलं आणि चिम्पांझीला काठीने मारायला सुरुवात केली. हे पाहून तिथे उपस्थित पर्यटकही चकित झाले. काही पर्यटक हे द़ृश्य पाहून हसूही लागले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT