Latest

भाजपचे डर्टी पॉलिटिक्स; कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची टीका

दिनेश चोरगे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  आम्ही अन्नभाग्य योजना जाहीर करताच कर्नाटकाला तांदूळ देण्यास नकार देऊन भाजपने डर्टी पॉलिटिक्स सुरू केले आहे. केंद्र सरकारकडे आम्ही फुकट तांदळाची मागणी केली नव्हती, तर प्रति किलो 34 रु. दर देणार होतो. परंतु केंद्राने अडवणूक करत तांदूळ देण्यास नकार दिल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्यांंनी केला.

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अन्नभाग्य योजनेचे सोमवारी विधानसौधमध्ये उद्घाटन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने राज्यातील जनतेच्या विरोधात द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे. राज्यातील जनता भुकेली राहू नये यासाठी आम्ही अन्नभाग्य योजना सुरू केली. परंतु त्यामध्ये राजकारण करण्यात येत आहे.

राज्यातील 4 कोटी 42 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रयेकी 170 रु. थेट जमा करण्यात येत आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या तोंडात दोन समाधानाचे घास गेले तर भाजपच्या पोटात का दुखते़? खात्यात जमा होणार्‍या पैशाचा उपयोग लाभार्थ्यांनी जेवणासाठी खर्च करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले. माहिती पत्रकाचे प्रकाशन आरोग्य मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी केले. परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी, बी. एस. सुरेश, एच. के. पाटील आदींसह आमदार उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT