Latest

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-राज्यपाल बैस यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याची मोठी माहिती मिळाली. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेले आहे.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांची ही नियोजित भेट नसल्याने. मुख्यमंत्री अचानक राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा काहीतरी नवीन पहायला मिळाणार अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात नवनविन घडामोडी पहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्रातील सत्तांतराच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या भेटीस गेल्याने पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT