Latest

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली सराटीत दाखल; जरांगे पाटलांची घेतली भेट

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्या सोळा दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१४) भेट घेतली. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित आहेत.

अंतरवाली सराटी येथे गेल्या सोळा दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपोषण सोडण्याची सशर्त तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ आणि खा. उदयनराजे भोसले आणि माजी खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सुधारित अध्यादेशाचे पत्र द्यावे, अशा अटी त्यांनी घातल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांची भेट घेतली.

SCROLL FOR NEXT