Latest

CM Eknath Shinde: संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमकीवर मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणाले,…

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जीवे मारण्याची धमकी मिळाली. यानंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ देखील करण्यात आली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विधान केले आहे. याविषयावर बोलताना ते म्हणाले, संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीची आम्ही  सखोल चौकशी करू, हा कोणत्या प्रकारचा स्टंट आहे का? हे देखील शोधू, तसेच राज्य पोलिस संजय राऊत यांच्या सुरक्षेविषयी काळजी घेतील असे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केला आहे. राऊत यांनी ठाण्यातील एका जामिनावर सुटलेल्या राजा ठाकूर या गुंडाला मला मारण्याची सुपारी दिल्याचे म्हटले आहे. तसेच यानंतर राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहले. राऊतांच्या या पत्रानंतर  चांगलीच खळबळ उडाली आहे. याची दखल घेत, राऊत यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे.

याप्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी ठाण्याचे पोलिस पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. या पथकात एसीपी दर्जाच्या अधिका-यासह सात जणांचा समावेश असून नाशिकमध्ये ज्या हॉटेलमध्ये संजय राऊत थांबले आहेत त्या हॉटेलच्या रुममध्ये त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे.

संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांना लिहलेलं पत्र व नाशिकमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात झालेलं आंदोलन तसेच व काही कार्यकर्त्यांनी त्यांना नाशिकमध्ये फिरु देणार नाही असेही म्हटले होते. त्यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिस दलातील कर्मचारी राऊत यांच्या सुरक्षेसाठी हॉटेल बाहेर थांबले आहेत. नाशिक पोलिसांनी संजय राऊत यांना सुरक्षा पुरविली आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.

SCROLL FOR NEXT