मुंबई : पुढारी वृत्तसेवा, छगन भुजबळ हे त्यांच्या विरोधातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नव्हते. आता बरे झाले. त्यांनी पक्ष सोडला. आम्ही आता मोकळा श्वास घेत आहोत, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केले. लोकसभा पार्श्वभूमीवर पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी भवनमध्ये गुरुवारी आयोजित आढावा बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. (Chhagan Bhujbal News)
नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त आमदार हे अजित पवार गटाकडे असले तरी जनता तुमच्या सोबत आहे.भुजबळ जेव्हा होते, तेव्हा आमचा श्वास हा अडकला होता; पण आता आम्ही तुम्ही सांगाल त्या उमेदवाराचा प्रचार करु, असेही काही पदाधिकारी या बैठकीत म्हणाले.
शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून लढण्याबाबत कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. पण आपण माढाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगरच्या लोकसभाआढावा बैठकीत कार्यकर्त्यांकडून आमदार प्राजक्त तानपुरे आणि आमदार रोहित पवार याना येत्या लोकसभेची उमेदवारी जाहीर करा अशा भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या.
हेही वाचा