Latest

CSK च्या भविष्यातील योजनेतील सर्वात मोठी चूक! कॅप्टन सापडला, पण…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल 2024 (IPL 2024) खूप महत्त्वाचे आहे. असे मानले जात आहे की 42 वर्षीय एमएस धोनीचा (MS Dhoni) हा शेवटचा सीझन असू शकतो. अशा स्थितीत सीएसकेने या मोसमाच्या सुरुवातीपासूनच भविष्यासाठी नियोजन सुरू केले आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाने हंगामाच्या सुरुवातीलाच नवीन कर्णधाराची घोषणा केली होती. धोनीच्या जागी ऋतुराज गायकवाडला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर गोलंदाजीतही संघाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली. परंतु संघात अद्याप एक स्थान शिल्लक आहे ज्यावर सीएसके व्यवस्थापनाला लवकरच तोडगा काढावा लागेल.

धोनीचा उत्तराधिकारी मिळाला (Chennai Super Kings)

ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) कर्णधार बनवण्याचा निर्णय आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जसाठी योग्य ठरला आहे. कर्णधार म्हणून आपली छाप सोडण्यात तो यशस्वी झाला आहे. अशा परिस्थितीत सीएसकेच्या व्यवस्थापनावरील एक मोठा ताण संपल्याचे दिसत आहे. वास्तविक, 2022 मध्ये सीएसकेने धोनीच्या जागी रवींद्र जडेजाला कर्णधार बनवले होते. पण त्याला यश आले नाही, त्यामुळे धोनीकडेच पुन्हा नेतृत्व बहाल करण्यात आले. पण 2024 च्या हंगामात गायकवाडच्या रुपात धोनीचा उत्तराधिकारी मिळाला आहे.

गोलंदाजी आक्रमणातही भविष्याची झलक

सीएसकेने (CSK) त्यांच्या गोलंदाजी आक्रमणात अनेक युवा खेळाडूंचा समावेश केला आहे, जो त्यांच्या भविष्यातील योजना दर्शवतो. संघात मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना आणि राजवर्धन हंगरगेकर आहेत. जे कमी अनुभव असूनही प्रतिस्पर्धी संघाच्या मोठ्या फलंदाजांना त्रास देत आहेत. सीएसकेने आपल्या संघात रचिन रवींद्र, निशांत सिंधू, समीर रिझवी अशा नव्या दमाच्या खेळाडूंचाही समावेश केला आहे. पण जेव्हा यष्टिरक्षकाचे नाव येते तेव्हा चाहत्यांना फक्त एमएस धोनीच दिसतो. या हंगामातही तो दुखापत असूनही यष्टीरक्षणाची जबाबदारी योग्यरित्या सांभाळत आहे.

CSK चा पुढचा यष्टिरक्षक कोण?

चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) संघाकडे पाहिले तर धोनीनंतर त्यांच्याकडे यष्टिरक्षक म्हणून एकच खेळाडू आहे आणि तो म्हणजे अवनीश राव अरावली. तेलंगणाच्या या खेळाडूला सीएसकेने यंदाच्या हंगामापूर्वी अवघ्या 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. मात्र त्याला अजून एकदाही खेळण्याची संधी मिळालेली नाही. सीएसकेने कर्णधार तसेच गोलंदाज, फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना भविष्यासाठी तयार केले आहे, परंतु अद्याप यष्टिरक्षकासाठीची पुढची योजना दिसत नाहीय. पुढील हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. अशा परिस्थितीत सीएसके इतर काही यष्टीरक्षकांवरही सट्टा लावू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT