Latest

IPL 2023 : चाहत्यांना आठवण येणार चिअर लीडर्सची

Arun Patil

मुंबई : आयपीएलचा थरार आजपासून सुरू होणार आहे. त्यावेळी चाहत्यांना चिअर लीडर्सची आठवण आल्यावाचून राहणार नाही. चिअर लीडर्समुळे आयपीएलला एक वेगळाच रंग चढला होता. चिअर लीडर्स यांना पाहण्यासाठी चाहते तुटून पडायचे. त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढायला मिळेल का, यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा; पण या चिअर लीडर्स एका आयपीएलमध्ये नेमके किती पैसे कमावतात, हे जर तुम्ही ऐकाल तर हैराण व्हाल. कारण सेलिब्रेटींनाही मागे टाकतील एवढी रक्कम चिअर लीडर्स एका सामन्यासाठी घेत असल्याचे समोर आले होते.

चिअर लीडर्स म्हणजे फक्त डान्सर नाहीत. डान्सरपेक्षा बर्‍याच विविध गोष्टी त्यांना मैदानात कराव्या लागतात. त्यांना फॉरमेशन करावे लागते आणि आपले शरीर हे सर्वात लवचिक ठेवावे लागते. त्यांना फक्त डान्स करून चालत नाही तर आपल्या संघातील खेळाडूंना, चाहत्यांना प्रोत्साहन कसे देता येईल, याचा विचारही त्यांना करावा लागतो. त्यामुळे या फक्त डान्सर नसतात तर चिअर लीडर हे आता एक प्रोफेशन झाले आहे. कारण या क्षेत्रात अमाप पैसा असल्याचे आता समोर आले आहे.

आयपीएलसाठी चिअर लीडर्सबरोबर करार केला जातो. हा करार संपूर्ण स्पर्धेसाठीचा असतो. एका आयपीएलच्या मोसमासाठी या चिअर लीडर्सना जवळपास 20 हजार डॉलर एवढे मानधन दिले जाते, म्हणजेच जवळपास 18 लाख रुपये त्यांना संघांकडून मिळत असतात, पण या कालावधीत बर्‍याच पार्ट्या होत असतात, जर त्यांना या ठिकाणी नेण्यात आले तर त्यांना वेगळे मानधन मिळत असते. सामना संपल्यावर काही ठिकाणी खास कार्यक्रम होतात. या सर्व गोष्टींसाठी त्यांना वेगळा बोनस मिळत असतो. त्यामुळे भारतामध्ये आलेल्या चिअर लीडर्सची दमदार कमाई होत असते.

चिअर लीडर्स यांना भारतामध्ये आल्यावर सेलिब्रेटींसारखे वाटते. याबाबतचा अनुभव काही चिअर लीडर्सने यापूर्वी कथन केला होता. कारण भारतामध्ये त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी लोकांची झुंबड उडते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT