Latest

Chandrayaan-3 : ‘चांद्रयान-3’च्या क्रायोजेनिक इंजिनची चाचणी यशस्वी

Arun Patil

नवी दिल्ली : भारताने आता 'चांद्रयान-3' (Chandrayaan-3) ची जय्यत तयारी सुरू केली आहे. हे यान जूनमध्ये प्रक्षेपित करण्याची 'इस्रो'ची योजना आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून 'एलव्हीएम-3' रॉकेटच्या सहाय्याने ते चंद्राकडे रवाना करण्यात येईल. या यानाच्या 'सीई-20' क्रायोजेनिक इंजिनची चाचणी यशस्वी झाली आहे.

'इस्रो'च्या अधिकार्‍यांनी सांगितले की 24 फेब्रुवारीला तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथे इस्रो प्रॉपल्शन कॉम्प्लेक्सच्या हाय अल्टिट्यूट टेस्ट फॅसिलिटीमध्ये 25 सेकंदांच्या निश्चित वेळेत ही चाचणी करण्यात आली. यावेळी सर्व पॅरामीटर समाधानकारक असल्याचे आढळून आले. क्रायोजेनिक इंजिनला पूर्णपणे एकीकृत उड्डाणासाठी प्रोपेलंट टँक, स्टेज स्ट्रक्चर आणि संबंधित द्रव लाईनसाठी एकीकृत केली जाईल. यापूर्वी 'इस्रो'ने 'चांद्रयान-3' (Chandrayaan-3) च्या लँडरचेही यशस्वी परीक्षण केले होते. '

इस्रो'ने म्हटले होते की हे परीक्षण उपग्रहांच्या निर्मितीच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरले आहे. 'चांद्रयान-3' (Chandrayaan-3) ही भारताची तिसरी चांद्रमोहीम आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर या मोहिमेत लँडर आणि रोव्हर उतरवण्यात येईल. 'चांद्रयान-1' मोहिमेतच जगाला समजले होते की चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आहे. 'चांद्रयान-2' मोहिमेत लँडरचे सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नव्हते, मात्र चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या 'ऑर्बिटर'कडून चंद्राची अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती संशोधकांना समजली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT