Latest

LIVE : Chandrayaan-3 : चांद्रयान- ३ अवकाशात झेपावलं, भारतासाठी ऐतिहासिक क्षण (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाचे तिसरे चंद्र मिशन 'चांद्रयान-३' चे अवकाशात झेपावलं. अख्ख्या देशाचं लक्ष या मोहिमेकडे लागून राहिले होते. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून आज शुक्रवारी १४ जुलैला दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी 'चांद्रयान-३' अंतराळात प्रक्षेपित झालं. (Chandrayaan-3) भारतासाठी हा क्षण सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवला जाईल, असे उद्गार पीएम मोदी यांनी काढले.

६१५ कोटी रुपयांचे बजेट 

या मोहिमेसाठी ६१५ कोटी रुपयांचे कोटींचे बजेट लागले आहे. हे मिशन जवळपास ५० दिवसांच्या यात्रेनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग करेल. हे लॉन्चिंग श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड-२ येथून होईल. यास चंद्रावर पाठवण्यासाठी LVM-3 लॉन्चरचा वापर करण्यात येईल.

LIVE –

  • ISRO मध्ये चांद्रयान 3 निश्चित कक्षेत यशस्वी प्रक्षेपणानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
  • चांद्रयान- ३ अवकाशात झेपावण्यास काही मिनिटे बाकी आहेत.
  • पीएम नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत चांद्रयान मोहिमेला शुभेच्छा दिल्या आहेत. "जिथे भारताच्या अवकाश क्षेत्राचा प्रश्न आहे, १४ जुलै २०२३ रोजी नेहमी सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिलं जाईल. चांद्रयान-३, आमचे तिसरे चांद्र मिशन आहे, आपल्या प्रवासाला निघून जाईल. हे उल्लेखनीय मिशन आशा आणि स्वप्नांना पुढे नेईल." आमचे राष्ट्र."
  • SDSC-SHAR, श्रीहरिकोटा येथे काउंटडाउन सुरू आहे. L110 टप्प्यात Propellant भरणे पूर्ण झाले आहे. C25 टप्प्यात Propellant भरण्याचे काम सुरू होत आहे, असे इस्रोचे म्हणणे आहे.
  • ISRO-NASA चा NISAR उपग्रह पृथ्वीच्या जमिनीच्या हालचाली, बर्फाच्या पृष्ठभागाचा अत्यंत बारीकसारीक तपशीलवार मागोवा घेणार. चांद्रयान-३ लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलने सुसज्ज आहे. त्याचे वजन सुमारे 3,900 किलोग्रॅम आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT