Latest

chandrayaan 3: चांद्रयान-3 ने गाठला पुढील टप्पा; पृथ्वीच्या अंतिम कक्षेत केला प्रवेश

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान-3 ने आज (दि.25 जुलै) पृथ्वीच्या अंतिम पाचव्या कक्षेत प्रवेश केला आहे. पृथ्वी सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यापूर्वी पृथ्वीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात यशस्वीपणे प्रवेश केला आहे. पुढचे काही दिवस हे यान पृथ्वीच्या अंतिम कक्षेत लंबवर्तुळाकार फिरेल. त्यानंतर 1 ऑगस्टपासून चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने आपला प्रवास सुरू करणार आहे. यानाच्या पुढच्या प्रवेशासाठी पुढील इंजिन फायर 1 ऑगस्ट 2023 रोजी मध्यरात्री 12 ते 1 च्या दरम्यान नियोजित करण्यात आले आहे, असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

चांद्रयान-3 चे 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले होते. दरम्यान यानाची हळूहळू पृथ्वीभोवती कक्षा वाढवली जात आहे. या यानाने आज पृथ्वीच्या अंतिम कक्षेत प्रवेश केला असून, पुढे ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार असल्याचे इस्रोकडून (chandrayaan 3) सांगण्यात आले आहे.

चांद्रयान-3 ने पृथ्वीची कक्षा सोडत चंद्राचे गुरुत्वाकर्षण कालांतराने त्याला चंद्राच्या कक्षेत खेचून घेईल आणि यानंतर यानाचा चंद्राच्या दिशेने पुढचा प्रवास सुरू होईल. चांद्रयान-3 ची मोहीम केवळ चंद्रापर्यंत नाही, तर चंद्रावर पोहोचण्यापलीकडे आहे. चंद्राच्या वातावरणाचा इतिहास, भूगर्भशास्त्र आणि संसाधनांच्या संभाव्यतेसह अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक प्रयोग करणे हे भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेचे उद्दिष्ट (chandrayaan 3) आहे.

chandrayaan 3 : 5 ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत

इस्रोच्या माहितीनुसार, 5 ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. एकदा यानाने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात प्रवेश केल्यावर, त्याची उंची हळूहळू कमी करण्यासाठी आणि चंद्राभोवती वर्तुळाकार कक्षेत प्रवेश करण्यासाठी कक्षा-कमी करणार्‍या युक्तीच्या मालिकेतून जाईल. तर 23 ऑगस्टला यानाला चंद्रावर लँड करण्याची योजना आहे.

२३ किंवा २४ ऑगस्ट यान चंद्रावर उतरणार

२३ किंवा २४ ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्युलपासून वेगळे होऊन लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील. दोघेही 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर विविध प्रयोग करतील, तर प्रोपल्शन मॉड्यूल ऑर्बिटरची भूमिका बजावेल, असे या पूर्वी इस्रोने जाहीर केले आहे. चांद्रयान-2' अंतर्गत लँडरला चंद्रावर जेथे उतरायचे होते, तेथेच (चंद्राच्या दक्षिण ध्रुवालगत 70 अंश अक्षांशावर) 'चांद्रयान-3' चे लँडरही उतरणार आहे.

चंद्राच्या कक्षेत राहून प्रोपल्शन मॉडेल पृथ्वीवरून येणार्‍या रेडिएशनचा अभ्यास करेल. मिशनच्या माध्यमातून 'इस्रो' चंद्राचा पृष्ठभाग किती भूकंपप्रवण आहे, तेही शोधून काढेल. चंद्रावरील माती आणि धुळीचे अध्ययन, विश्लेषण केले जाईल, असेही इस्रोने सांगितले आहे.

चांद्रयान-3 : घटनाक्रम

14 जुलै : चांद्रयान 36500 कि.मी. द 170 कि.मी.च्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले.

15 जुलै : पहिल्यांदाच कक्षा 41762 कि.मी. द 173 कि.मी.पर्यंत वाढविण्यात आली.

17 जुलै : दुसर्‍यांदा ती 41603 कि.मी. द 226 कि.मी. वाढवण्यात आली.

18 जुलै : तिसर्‍यांदा 51400 कि.मी. द 228 कि.मी. अशी कक्षा वाढविण्यात आली.

20 जुलै : कक्षा चौथ्यांदा 71351 कि.मी. द 233 कि.मी.पर्यंत वाढवण्यात आली.

25 जुलै : पाचव्यांदा चांद्रयान-३ ची कक्षा वाढवण्यात आली. ही कक्षा पूर्ण करून यान चंद्राच्या दिशेने जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT