चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : एकत्र काम करीत असताना कर्जावर खरेदी केलेल्या मोटार सायकलची किस्त वेळेवर न भरणे तसेच वडिलाला मोबाईलवरून शिवीगाळ केली म्हणून झालेल्या भांडणात चंद्रपुरात ठाकरे गटाचे युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर याचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना गुरूवारी (दि.२५) आठच्या सुमारास घडली. निलेश हिवराळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चंद्रपूर पोलिसांनी आठ संशयित आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. Chandrapur Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील अरविंद नगरातील निवासी शिवा मिलींद वझरकर (वय 25) हा ठेकेदारीचा काम करतो. शिवा वझरकर व हिमांशू कुमरे हे दोन वर्षाआधी स्वप्नील काशीकर (रा. चौरे लेआऊट चंद्रपूर) यांच्याकडे ठेकेदारीचे काम करीत होते. नंतर शिवाने पगाराच्या करणावरुन स्वप्नील काशीकर याचेकडे काम करणे बंद केले. तेव्हाच दोन वर्षापुर्वी स्वप्नील काशीकर याने (एम. एच. 34, 1500) या क्रमांकाची मोटारसायकल शिवा वझरकर याच्या नावावर कर्जावर विकत घेतली होती. Chandrapur Crime News
सध्या दुचाकी स्वप्नील काशीकर याच्या ताब्यात आहे. दरम्यान, कर्जाचे हप्ते स्वप्नील काशीकर भरत नसल्याने याच कारणावरून त्यांच्यात भांडण होत होते. सध्या स्वप्नील काशीकर आणि हिमाशू कुमरे हे सोबत ठेकेदारीचे काम करतात. शिवाने त्यांच्याकडे काम करणे बंद केल्यामुळे त्या दोघांचेही चांगले पटत होते.
गुरूवारी रात्री आठच्या सुमारास तुकूममधील कॉलेजच्या बाजूला शिवा वझरकर, साहील सिडाम, समीर शेख, नासीर शेख, राज सोपर आदी मित्र मिळून चर्चा करीत होते. यावेळी हिमांशू कुमरे याने शिवाच्या मोबाईलवर कॉल केला. तेव्हा शिवाने त्याचे मोबाईलचा स्पिकर ऑन करून त्याच्याशी बोलला असता हिमांशू कुमरे यांने शिवाच्या वडिलाबाबत अपशब्द काढले. त्यानंतर त्याने शिवाला स्वप्नील काशीकरच्या ऑफीस समोर बोलावून घेतले. रात्री साडेआठच्या सुामरास मृत शिवा आपल्या मित्रांसह काशीकर याच्या ऑफीसजवळ गेले. तेव्हा आरोपी स्वप्नील काशीकर (वय 38), हिमांशू कुमरे (वय 25), चैतन्य आसकर (वय 20), रिझवान पठाण (वय 25), नाझीर खान (वय 21), रोहीत पितरकर (वय 24), सुमित दाते (वय 27), अन्सार खान (वय 25) तेथे हजर होते.
आरोपी हिमांशू कुमरे यांने चाकूने शिवा वझरकर यांच्या पोटात खुपसला. त्यामुळे शिवा जमिनीवर कोसळला. त्याच्या पोटातून रक्त सांडू लागले. त्यानंतर हिमांशू व अन्य आरोपींनी रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या शिवाला लाथाबुक्यांनी मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात पडून असताना काही मित्रांनी त्याला दवाखान्यात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे तुकूम परिसरात तणावाची परिस्थती निर्माण झाली होती. आरोपींच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. यावेळी आरोपी पसार झाल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी वेळीच येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
हेही वाचा