बारामती; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'सहयोग' या निवासस्थानी दाखल झाले आहेत. येथे सुनेत्रा पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
महायुतीच्या बैठकीच्या निमित्ताने ना. पाटील रविवारी (दि. १७) रोजी बारामतीत दाखल झाले आहेत. त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री भागवत कराड येथे भेटीसाठी आले होते.
सहयोग'वरील चर्चेनंतर पाटील हे भाजप कार्यालयात जाणार आहेत. तेथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते मोरोपंत नाट्यगृहात महायुतीची समन्वय समितीची बैठक घेणार आहेत. या बैठकीला लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा क्षेत्रातून महायुतीतील आमदार व अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे नियोजित कार्यक्रमामुळे पूर्वसंमतीने तर विजय शिवतारे हे रुग्णालयात दाखल असल्याने या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
हेही वाचा :