Latest

चांद्र विजयाचा देदीप्यमान प्रवास

backup backup

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून 14 जुलै रोजी 3 वाजून 35 वाजता प्रक्षेपित करण्यात आले होते. यानाने चाळीस दिवसांत 3.84 लाख कि.मी. अंतर कापले आणि विक्रम लँडर बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले…

एलव्हीएम 3 या महाबली रॉकेटने चांद्रयान-3 प्रक्षेपित झाले.

16 मिनिटांनी रॉकेटने यानाला पृथ्वीच्या कक्षेत सोडले.

14 जुलै ते 31 जुलै यान पृथ्वीच्या अंडाकृती कक्षेत राहिले.

थ्रस्टर फायरिंगच्या माध्यमातून
यानाने 5 वेळा कक्षांतर (कक्षा वाढवत नेऊन) केले

1 ऑगस्ट रोजी स्लिंगशॉट तंत्राच्या
माध्यमातून पृथ्वीच्या कक्षेतून यान बाहेर पडले आणि चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

5 ऑगस्ट रोजी यानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.

6 ते 16 ऑगस्टपर्यंत चंद्राभोवती 4 कक्षांतरे झाली.

17 ऑगस्टला विक्रम लँडर हे प्रॉपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करण्यात आले.

18 ऑगस्टला पहिले आणि 20 ऑगस्टला दुसरे डीबूस्टिंग होऊन लँडर 134 ु 25 असे चंद्राच्या सर्वांत जवळच्या कक्षेत आले… आणि

विक्रम लँडर बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले…
प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरपासून वेगळे झाल्यानंतर पुढचे 14 दिवस रोव्हर (प्रज्ञान) हे लँडरच्या चोहीकडे आणि 360 अंशात फिरत राहील. अनेक चाचण्या करेल. चंद्राच्या पृष्ठभागावर उमटणार्‍या रोव्हरच्या पाऊलखुणांची छायाचित्रेही लँडरकडून पाठविली जातील. लँडरमध्ये 5, रोव्हरमध्ये 2 उपकरणे आहेत. ते तापमान, माती आणि वातावरणातील घटक आणि वायूबद्दलची निरीक्षणे नोंदवतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT