Latest

Rain Update : कोकणात आज पावसाची शक्यता

अमृता चौगुले

पुणे : मध्य पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सोमवारी देशातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोकणपट्टीत हलका ते मध्य पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे दक्षिण भारतातील पाऊस वाढला आहे. केरळमध्ये 16 रोजी ऑरेंज तर कर्नाटकमध्ये यलो अलर्ट दिला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रावात सक्रिय झाल्याने काश्मीरपासून मध्य प्रदेशपर्यंत 16 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट दिला आहे. तथापि येत्या 17 पासून पाऊस पुन्हा कमी होत जाणार आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात सोमवारी हवामान कोरडे वातावरण राहील.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT