Latest

पुण्यात दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता

अमृता चौगुले

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, तसेच उत्तर भारतात पश्चिमी चक्रवाद सक्रिय झाल्याने दोन्ही वाऱ्यांची टक्कर महाराष्ट्रावर होत आहे. विदर्भासह मध्यमहाराष्ट्रातील काही भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आगामी दोन दिवस स्थरावर बाष्पयुक्त ढगांची गर्दी राहील. त्यामुळे आज ३० आणि ३१ मार्च रोजी शहरात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT