Latest

Central Railway : सोशल मीडियावर मध्य रेल्वे देशात पहिल्या क्रमाकांवर

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाचा वापर करण्यात मध्य रेल्वे ( Central Railway ) देशभरातील रेल्वेमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. महिन्याभरात पब्लिक अ‍ॅपवर 29 व्हिडिओला 91 लाख 31 हजार 393 व्ह्यूव मिळाले आहेत. भारतीय रेल्वेच्या 34 विभागांमध्ये मध्य रेल्वे अ‍ॅप टॉपवर आहे.

रेल्वे देशभरात धावते. प्रवाशांच्या तक्रारीचे निवारण करण्यापासून सुचना किंवा मदतीसाठी भारतीय रेल्वे सोशल मीडियाचा वापर करते. भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांकडून सोशल मीडियावर प्रवाशांना सूचना देणारे व्हिडीओ शेअर केले जातात. पब्लिक अ‍ॅपवर हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात नागरिक-प्रवाशांकडून पाहिजे जातात. महिन्याभरात मध्य रेल्वेच्या या अ‍ॅपवरील 29 व्हिडिओला 91 लाख 31 हजार 393 व्ह्यूव मिळाले आहे. या यादीत कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे, मेट्रो, रेलटेल आणि इतर एकूण 34 विभाग आहेत.

एक्स अकाऊंट सुसाट

मध्य रेल्वेच्या एक्स अकाऊंटवर प्रवाशांच्या सूचना विचारात घेऊन त्यांचे निराकरणही केले जाते. सध्या मध्य रेल्वेच्या एक्स अकाऊंटला मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. ( Central Railway )

SCROLL FOR NEXT