Latest

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता वाढीची भेट

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळण्याची शक्यता आहेही वाढ तीन टक्क्यांची असेल की चार टक्क्यांची याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीसाठी केंद्र सरकार महागाई भत्ता वाढविण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले आहेया निर्णयामुळे एक कोटी सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना थेट लाभ मिळेल.

दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यातदोनदा केंद्र सरकारतर्फे महागाई भत्त्यात वाढ केली जातेत्यानुसार चार महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय २४ मार्चला जाहीर करण्यात आला होताया निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये ३८ वरून ४२ टक्के अशी वाढ मिळाली होती आणि १ जानेवारीपासून हा फरक देय होताआताकेंद्र सरकार तीन टक्के महागाई भत्ता वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहेमात्रग्राहक मूल्य निर्देशांक आणि खाद्यपदार्थ मूल्य निर्देशांकामध्ये झालेल्या बदलाच्या दुसऱ्या सहामाईसाठी चार टक्के महागाई भत्ता वाढीची मागणी केली जात आहेजी२० शिखर बैठकीनंतर केंद्रीय मंत्रीमंडळाकडन यावर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहेचार टक्क्यांची वाढ झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवर पोहोचणार असून ४७.५८ लाख कर्मचारी व ६९.७६ लाख निवृत्तीवेतन धारकांना याचा लाभ मिळेल.

SCROLL FOR NEXT