Latest

celebrities fraud : सेलेब्सच्या नावाने ५० लाखांची फसवणूक, टोळीतील एकटा बी टेक झालेला!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री आलिया भट्ट, एम एस धोनी, सचिन तेंडुलकर, सैफअली खान, ऋतिक रोशन, शिल्पा शेट्टी आणि इतर दिग्गज अभिनेत्यांच्या नावाने बँकेतून आतापर्यंत तब्बल ५० लाख रुपयांहून अधिक रक्कम काढून (celebrities fraud)फसवणूक करण्यात आलीय. सेलिब्रिटीच्या नावाने बनावट पॅनकार्डद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पदार्फाश पोलिसांनी केलाय. विशेष म्हणजे, या टोळीतील एकट्याने बी. टेकचे शिक्षण घेतले आहे, अशी माहिती समोर आलीय.  (celebrities fraud)

'या' सेलेब्सच्या नावाने फसवणूक

ही टोळी सेलिब्रिटींची ओळख आणि इतर खोट्या माहितीचा वापर बँकांमध्ये करत होती. या डिटेल्सचा वापर करून टोळीने ५० लाख रुपयांहून अधिक रक्कम काढली. फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी पाच लोकांना अटक केलीय. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे हे ठग मोठमोठ्या दिग्गजांचे बनावट पॅन कार्ड वापरून बँकांना लाखों रुपयांचा चुना लावत होते. या टोळीने सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी, सोनम कपूर, ऋतिक रोशन अन्य स्टार्सच्या नावाने फसवणूक केलीय.

पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

पोलिस म्हणाले की, सर्वांना अटक करण्यात आलीय. प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे याप्रकरणी माहिती दिली जाऊ शकत नाही. या टोळीतील एकजण बीटेक झालेला आहे, अशी माहिती समोर आलीय.

SCROLL FOR NEXT