Latest

निकालाची टक्केवारी जाहीर न करण्याचा सीबीएसईचा निर्णय

दिनेश चोरगे

मुंबई : सीबीएसई दहावी, बारावीच्या निकालात 2024 मध्ये होणार्‍या परीक्षेपासून विद्यार्थ्यांना निकालात श्रेणी, डिस्टिंक्शन दिले जाणार नाही. त्याच्या निकालाची टक्केवारीही सांगितली जाणार नाही. सीबीएसईने श्रेणी, डिस्टिंक्शन तसेच अ‍ॅग्रीगेट गुण हे प्रकारच रद्द केले आहे. तसेच गुणपत्रिकेवर विभागणी, फरक किंवा गुणांची बेरीज न देण्याचाही निर्णय घेतला आहे.

सीबीएसई मंडळाकडून देशभरातील 16 हजार कनिष्ठ महाविद्यालयांतील 17 लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा दरवर्षी 7 हजार केंद्रावर देतात; तर दहावीला देशभरातील 25 हजार शाळांतील 21 लाख विद्यार्थी सुमारे 8 हजार केंद्रावर परीक्षा देतात. याच परीक्षांतील गुणांची आणि टक्केवारीची असलेली चढाओढ टाळण्यासाठी अनेक मंडळांनी गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रथा बंद केली. पण त्यानंतरही स्पर्धा थांबली नाही. गुणांची टक्केवारी, त्यावर आधारित करिअर हे समीकरण जोपर्यंत आहे तोपर्यंत ही स्पर्धा असल्याने आता सीबीएईने पुढचे पाऊल टाकले आहे. आता विद्यार्थ्यांना केवळ विषयांचे गुणच कळणार आहे.

SCROLL FOR NEXT