Latest

CBSE 10th 12th Result 2023 | सीबीएसई १० वी, १२ वी निकालाची तारीख, वेळ आज जाहीर होणार, जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE लवकरच १० वी १२ वी २०२३ परिक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. या आठवड्यातच हे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. हे निकाल अधिकृत वेबसाइट – results.cbse.nic.in, cbseresults.nic.in, cbse.gov.in आणि digilocker.gov.in वर पाहाता येतील. विद्यार्थी त्यांचे रोल नंबर, admit card ID, शाळा क्रमांक आणि जन्मतारीखेच्या आधारे त्यांचे गुण तपासू शकतात. या वेबसाइट्स व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल उमंग ॲप्सवर देखील पाहायला मिळतील. (CBSE 10th 12th Result 2023)

सीबीएसई १० वी आणि १२ वीचे निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याची शक्यता आहे. यंदा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण ३८ लाख ८३ हजार ७१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २१ लाख ८६ हजार ९४० विद्यार्थी १० वी आणि १६ लाख ९६ हजार ७७० विद्यार्थी १२ वीचे आहेत.

इयत्ता १० वीच्या उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन १६ एप्रिलच्यादरम्यान आणि १२ वीचे मूल्यांकन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण झाले आहे. याआधारे CBSE आता निकाल जाहीर करण्याच्या तयारीत आहे. CBSE बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली. इयत्ता १० वीची परीक्षा २१ मार्च रोजी संपली, तर १२वीची परीक्षा ५ एप्रिल रोजी संपली होती.

CBSE 10th 12th Result 2023- निकाल कोठे पाहाता येईल?

निकाल ऑनलाइन कसा पाहाता येईल

results.cbse.nic.in वर जा

10 or 12th निकालाच्या पेजवर जा

विचारलेली माहिती भरून लॉग इन करा

तुमचा CBSE निकाल तपासा आणि डाउनलोड करा

Scorecard तपासण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

-बोर्ड परीक्षेचा रोल नंबर

– ॲडमिट कार्ड

– शाळा क्रमांक

– जन्मतारीख

अधिकृत वेबसाइट क्रॅश झाली तर? निकाल तपासण्याचे पर्यायी मार्ग

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT