Latest

Rolls Royce : विमान खरेदीतील भ्रष्टाचार प्रकरणी रॉल्स रॉयस कंपनीसह संचालकावर गुन्हा दाखल

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय तपास संस्था, सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात ब्रिटिश एअरोस्पेस कंपनी रॉल्स रॉयस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसेच कंपनीचे संचालक टिम जोन्स विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास संस्था लवकरच नोटीस जारी करीत प्रकरणाशी संबंधितांची चौकशी करण्याची शक्यता आहे. शस्त्रास्त्र डिलर सुधीर चौधरी तसेच भानू चौधरी यांच्यासह इतर सरकारी कर्मचारी तसेच खासगी व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२४ हॉक तसेच ११५ अँडव्हान्स जेट ट्रेनर एअरक्राफ्ट खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल झाला आहे.अज्ञात कर्मचाऱ्यांनी सरकारी पदाचा दुरूपयोग करीत मेसर्स हिंदुस्तान एअरोनॉटिक्स् लिमिटेडने बनवलेल्या ४२ अतिरिक्त विमानांना परवाना देण्याची परवानगी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आरोपींनी ७३४.२१ दशलक्ष रुपयांचे २४ हॉक आणि ११५ अँडव्हान्स जेट ट्रेन विमान खरेदी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.याप्रकरणात २०१६ मध्ये तपास सुरू करण्यात आला होता.

SCROLL FOR NEXT